शुक्रवार, ३ मे, २०२४

निंबा मोंढू आहिरे -वर्ग मित्र.

व्यक्तिमत्

     निंबा मोंढू आहिरे हा माझा प्राथमिक शाळेतला मित्र .किंचित वयाने मोठा परंतु समवयस्क.खोडकर तथापि अभ्यासात हुशार.मी,निंबा आणि भिला वाघ  अशा तिघातच अभ्यासात चढाओढ असायची  .त्या वयात सुद्धा गटबाजी होती.एक नारायण जयला यांचा गट व दुसरा निंबा मोंढू चा गट.मी नारायण च्या गटात होतो.निंबा च्या गटात नारायण भावसार, गोविंदा रोडू ,भिला वाघ,कांतीलाल कांकरिया,राजमाल छाजेड, तर आमच्या गटात रोडू झिपृ ,दादाजी तुळशीराम,गमन दशरथ ,गमन छबुलाल पैठणकर  असे होते  आता मी आणि निंबा भाऊ असे दोघेच आहोत.इतर सर्व देवाघरी.

            आता आम्ही दोघे नव्वदीच्या दशकातून कालक्रमाना करीत आहोत.लोक आपल्या जीवनाशी जगण्याचा हिशोब लावत असतात  पण ते सारे नाटकीय असते. क्षण एक पुरे प्रेमाचा ,वर्षाव घडो मरणाचा,.ओतपोत दीर्घ जीवन निरर्थक ,पेक्षा सुखद अल्पायुषी मरण सुरेखच .