शुक्रवार, ३ मे, २०२४

निंबा मोंढू आहिरे -वर्ग मित्र.

व्यक्तिमत्

     निंबा मोंढू आहिरे हा माझा प्राथमिक शाळेतला मित्र .किंचित वयाने मोठा परंतु समवयस्क.खोडकर तथापि अभ्यासात हुशार.मी,निंबा आणि भिला वाघ  अशा तिघातच अभ्यासात चढाओढ असायची  .त्या वयात सुद्धा गटबाजी होती.एक नारायण जयला यांचा गट व दुसरा निंबा मोंढू चा गट.मी नारायण च्या गटात होतो.निंबा च्या गटात नारायण भावसार, गोविंदा रोडू ,भिला वाघ,कांतीलाल कांकरिया,राजमाल छाजेड, तर आमच्या गटात रोडू झिपृ ,दादाजी तुळशीराम,गमन दशरथ ,गमन छबुलाल पैठणकर  असे होते  आता मी आणि निंबा भाऊ असे दोघेच आहोत.इतर सर्व देवाघरी.

            आता आम्ही दोघे नव्वदीच्या दशकातून कालक्रमाना करीत आहोत.लोक आपल्या जीवनाशी जगण्याचा हिशोब लावत असतात  पण ते सारे नाटकीय असते. क्षण एक पुरे प्रेमाचा ,वर्षाव घडो मरणाचा,.ओतपोत दीर्घ जीवन निरर्थक ,पेक्षा सुखद अल्पायुषी मरण सुरेखच .

रविवार, २६ सप्टेंबर, २०२१

नस्तनपूर सहल -ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ पाटणे

नस्तनपूर  सहल -ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ पाटणे 

 पाटणे - पाटणे  ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाची  पूर्व घोषित नस्तनपुर  नांदगाव सहल  दिनांक  २५/०९/२०२१ रोज शनिवारी  सकाळी  cruzer बस  ने   सडे नऊ वाजता  निघाली . एकूण आठ महिला व सहा  पुरुषांनी  सहभाग नोंदविला . बरोबर ११ वाजता नांदगाव  पोहचलो . पूर्व नियोजना  नुसार  नांदगाव  तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे  अध्यक्ष व भूतपूर्व  सेवावृत्त मेडिकल ऑफिसर श्री  गोरखनाथ एस देवरे  रेल्वे फटका जवळ स्वागत साठी उभे होते. सर्व ज्येष्ठानां  पाहून त्यांना अतिशय आनंद झाला होता .         प्रीतिभोजन -प्रवासाची  प्राथमिक चवकशी व चहापान   झाले .   विचारपुस झाली.  ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवित असलेल्या उपक्रमांची देवाण घेवाण झाली . ज्येष्ठाप्रती राज्य व केंद्र शासनाच्या  उदासीन धोरणा  बद्दल निषेध व्यक्त करण्यात आला ..

     त्या नंतर शुभेच्छा देऊन आमची सहल सुखदायी व्हावी   अशी अपेक्षा व्यक्त करून नस्तनपूर कडे आम्ही प्रयाण केले.

वडिलांचे पितृश्राद्ध साधून प्रीतीभोजनाचा जमवून आणलेला  संगम  आम्हास अतिशय सुखद वाटला.

गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१

RAJA & RANI

  मी आणि माझी जया 
                      आमचे गाव पाटणे . मालेगाव तालुक्यातील.  बंगाली पाटाने , तसेच झाडू व बाळा दादाचे  पाटणे  म्हणून सुद्धा ओळखले जाते . ह्या खेडे गावात आम्ही परंपरेने राहात आहोत . आमचा व्यवसाय शेतीचा .             
                         अशा खेडेगावात जया माझ्यायासी  विवाहबद्ध होऊन सॅन १९६४  मध्ये  आली व आमचा संसार सुरु झाला. 
Posted by Picasa