नस्तनपूर सहल -ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ पाटणे
नस्तनपूर सहल -ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ पाटणे
पाटणे - पाटणे ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाची पूर्व घोषित नस्तनपुर नांदगाव सहल दिनांक २५/०९/२०२१ रोज शनिवारी सकाळी cruzer बस ने सडे नऊ वाजता निघाली . एकूण आठ महिला व सहा पुरुषांनी सहभाग नोंदविला . बरोबर ११ वाजता नांदगाव पोहचलो . पूर्व नियोजना नुसार नांदगाव तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व भूतपूर्व सेवावृत्त मेडिकल ऑफिसर श्री गोरखनाथ एस देवरे रेल्वे फटका जवळ स्वागत साठी उभे होते. सर्व ज्येष्ठानां पाहून त्यांना अतिशय आनंद झाला होता . प्रीतिभोजन -प्रवासाची प्राथमिक चवकशी व चहापान झाले . विचारपुस झाली. ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवित असलेल्या उपक्रमांची देवाण घेवाण झाली . ज्येष्ठाप्रती राज्य व केंद्र शासनाच्या उदासीन धोरणा बद्दल निषेध व्यक्त करण्यात आला ..
त्या नंतर शुभेच्छा देऊन आमची सहल सुखदायी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करून नस्तनपूर कडे आम्ही प्रयाण केले.